Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

बेळगांव ग्रामीण युवा काँग्रेसच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल

  बेळगाव : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्ता पिंटू महादेव यांच्याविरुद्ध बेळगाव पोलीस आयुक्तांकडे बेळगांव ग्रामीण युवा काँग्रेस यांच्यावतीने युवा नेता मृणाल दादा हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करण्यात आली. बेळगाव पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी तक्रार स्वीकारली. यावेळी उचगांव ब्लॉक युवा …

Read More »

रामनगर-अळणावर मार्गावरील कुंभार्डा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन पादचारी जागीच ठार

  खानापूर : आज गुरुवार दि. २ रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास रामनगर-अळणावर मार्गावरील कुंभार्डा (ता. खानापूर) गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दोन पादचारी जागीच ठार झाले आहेत. सीमा अमर हळणकर (२४) आणि रवळू भरमाणी चौधरी (६५), दोघेही रा. कुंभार्डा, अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कुंभार्डा गावापासून सुमारे एक किलोमीटर …

Read More »

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेन : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  बंगळूर : कर्नाटकात नेतृत्वाची चर्चा सुरू असताना, ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. कुनिगलचे आमदार एच. डी. रंगनाथ यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारावा असे म्हटले होते. “मी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्री राहीन,” असे …

Read More »

विश्व विख्यात म्हैसूर दसऱ्याची आज जंबो सवारीने होणार सांगता

  देश – विदेशातील पर्यटकांची गर्दी; मिरवणुकीची जय्यत तयारी बंगळूर : राज्याचा प्रमुख सण असलेल्या दसरा महोत्सवातील सर्वात महत्वाचे आकर्षण असलेल्या जंबोसावरी मिरवणुकीसाठी पॅलेस सिटी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी १ ते १.१८ दरम्यान, शुभ धनुर लग्नादरम्यान राजवाड्याच्या उत्तर (बलराम) दारावर नंदीध्वजाची पूजा करून मिरवणुकीचे उद्घाटन करतील. ते …

Read More »

‘बेधडक शक्तीस्वरूप 2025’ उत्कृष्ट देवीमूर्ती स्पर्धेचा निकाल जाहीर

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेधडक बेळगाव आयोजित ‘बेधडक शक्तीस्वरूप 2025 उत्कृष्ट देवीमूर्ती स्पर्धा’ मोठ्या उत्साहात पार पडली. विविध मंडळांनी साकारलेल्या कलात्मक व भक्तिभावपूर्ण देवीमूर्तींपैकी सर्वोत्तम मूर्तींना पारितोषिके जाहीर करण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे : 🥇 प्रथम क्रमांक – बेळगावची मानाची आई भवानी, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, STM समर्थ नगर, बेळगाव 🥈 …

Read More »

वंटमुरी घाटात झालेल्या अपघातात चापगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील चापगाव येथील एक दुचाकीस्वार नवरात्रीला आपल्या गावी येऊन परत इचलकरंजीला आपल्या कामावर हजर होण्यासाठी जात असताना आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास वंटमुरी घाटात त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन, त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, …

Read More »

महिलांच्या संरक्षणासाठी आयोग कटिबद्ध : रुपाली चाकणकर

  कोल्हापूर : समाजातील महिलांचे स्थान उंचावण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित ‘पॉश कायदा २०१३’ (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण) विषयावरील प्रशिक्षण सत्रात त्या बोलत होत्या. …

Read More »

राज्यात पुरामुळे ८.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान – बैरेगौडा

  बंगळूर : काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः उत्तर कर्नाटक प्रदेशात, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ८.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले. भीमा नदीला आलेल्या पुराचे आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण केले जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. भीमा नदीत दररोज २.८ लाख क्युसेक इतके …

Read More »

बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदान पाहणी केली

  बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदान (मराठी विद्यानिकेतन) पाहणी केली व येणाऱ्या 02 ऑक्टोबर 2025 विजयादशमी दिवसाच्या नियोजनाबद्दल माहिती घेतली आणि सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे शिस्तबद्ध नियोजनासाठी आदेश दिले. याप्रसंगी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास …

Read More »

नेसरी ग्रामस्थ मंडळ नेसरी, ता. गडहिंग्लज येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यतीचे आयोजन

  नेसरी : नेसरी ग्रामस्थ मंडळ नेसरी, ता – गडहिंग्लज जि – कोल्हापूर येथे भव्य बैलगाडा पळवणेची जंगी शर्यत “पाव्हणं बाजूला व्हा.. गाडी सुटलेली हाय..” कोण होणार.. नेसरीच्या हिंदकेसरी मैदानाचा मानकरी.. “डिजीटल धागा कट” खास विजयादशमी दसऱ्या निमित्त गुरुवार दि. ०२/१०/२०२५ रोजी सकाळी ठीक ०८ वाजता आयोजित केली आहे. तरी …

Read More »