बेळगाव : कोरोनामुळे शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दू यांनी पुढाकार घेत सदाशिवनगर येथील जैन मंदिरात सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले. डॉक्टर सविता कद्दू म्हणाल्या, मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक जण येतात, यामुळे आम्ही प्राधान्याने शहर परिसरातील मंदिरांचे निर्जंतुकीकरण करण्याचा संकल्प केला आहे. या कार्यासाठी डॉ. सविता कद्दू, डॉ. राजश्री अनगोळ, आरती निपाणीकर, श्रीनिवास गुडमट्टी, विनय पाटील यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta