बेंगळुरू : कर्नाटक सरकारने तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वंकष सर्वेक्षण केले असून अंदाजे २०९.३० कोटी इतके नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
केंद्राला दिलेल्या निवेदनात, राज्य सरकारने चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची यादी दिली असून त्यामध्ये १,०४७ कि.मी. रस्ते, समुद्र-क्षरण संरक्षण भिंती, ४७३ घरे, ७१ शासकीय इमारती, २९ छोटी सिंचन योजना, ७९ ट्रान्सफॉर्मर आणि १०७ किमी विद्युत लाइन २६३ नौका यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मच्छिमारांच्या उदरनिर्वाहावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्नाटक सरकारने तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी केंद्राला केंद्रीय टीम (आयएमसीटी) पाठवण्यास सांगितले आहे.