खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात सर्वातून भितीचे वातवरण पसरले होते. जो तो कोरोनाची भिती बाळगुन जीवन जगत होता. अशा कोरोनाच्या काळात खेडोपाडी कोरोना बाधितांच्या सेवेसाठी पत्रकारानी धीर देऊन कोरोनावर मात करण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती घेऊन सर्वांपर्यंत पत्रकारितेच्या माध्यमातून कार्य केले. अशा तालुका पत्रकाराना भाजप युवा मोर्चाच्यावतीने किट्सचे वितरण सार्वजनिक बांधकाम खाते विश्रामधाम कार्यालयाच्या आवारात नुकताच करण्यात आले.
यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, तालुका पत्रकारानी कोरोना काळात खेडोपाडी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन तालुक्यातील जनतेला माहिती पुरविली. त्यामुळे नागरिकांना कोरोनावर मात करण्यासाठी बळ आले, विश्वास आला. कोरोनाबद्दल माहिती मिळाली. यातून अनेक कोरोना बाधित सुखरूप बाहेर पडले. त्यांच्या धाडसी कामाचे कौतुक करावे. तसेच त्याना फेसमास्क, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्याचे भाजप युवा मोर्चाच्यावतीने वितरण करून सहकार्य केले याबद्दल युवा मोर्चाचे अभिनंदन होत आहे. असे सांगितले.
भाजप नेते विठ्ठल हलगेकरसह पत्रकारानी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला आपय्या कोडोळी, सुरेश देसाई, गुंडू तोपिनकट्टी, मारूती पाटील, तानाजी गोरल उपस्थित होते.
तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दर्शन किल्लारी, रूद्पा तुळाजी, मारूती टक्केकर, बाळेशी अक्षिमणी, नागराज तिबोजी, संतेष निलगी, मारूती उमनगोळ, प्रविण गायकवाड, प्रताप बंबाडी, अदृश्य कामतगी, अनिल मिटगार व इतर युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!
Spread the love खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील …