खानापूर (प्रतिनिधी) : कोविड लस देण्यासंदर्भात कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ खानापूर तालुका संघटनेच्यावतीने तालुका वैद्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे याना गुरूवारी दि. १० रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे. की, सरकारी नोकरासाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी खास कोविड लसीचे कॅप पुढील आठवड्यात आयोजन करण्यात यावे.
यावेळी तालुका वैद्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यानी निवेदनाचा स्विकार करून कोविड लस कॅपचे आयोजन करू असे आश्वासन दिले.
निवेदन देताना कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष बी. एम. येळ्ळूर, कार्यदर्शी श्री. छोट्टणावर, खजीनदार जे. पी. पाटील, श्री. कोलकार, श्री. आशपाक, श्री. गस्ती, श्रीमती शोभा सौंदती व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta