खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे देशभर हाहाकार माजला आहे. गेल्या वर्षभरात सामान्य माणसाला जीवन जगणे मुष्किल झाले. अशातच नविन संकाटाला तोंड देण्यासाठी पावसाळी दुष्काळ निवारण समितीची बैठक खानापूर तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रेश्मा तालिकोटी होत्या. बैठकीत यंदाच्या पावसाळी हंगामात होणाऱ्या दुष्काळी निवारणासाठी पूर्व कल्पना देण्यासाठी चर्चा करण्यात आली.
दुष्काळ निवारण समितीच्या बैठकीला तालुक्यातील अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली.
त्यामुळे बैठकीला अधिकाऱ्यांची संख्याही कमी होती. मोजक्याच तालुका अधिकाऱ्यांच्या उपस्थित दुष्काळ निवारण बैठक गुंडाळण्यात आली.
तेव्हा गैरहजर तालुका अधिकाऱ्यांच्यावर तहसीलदार रेश्मा तालिकोटी कोणती कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागुन राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta