खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील कन्नड शाळेजवळील बेंगळुरू आयंगर बेकरीतील घेतलेल्या पदार्थात अळ्या सापडल्याची तक्रार अशोकनगर येथील कार्तिक बिरजे यांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेंगळूर आयंगर बेकरीतून कार्तिक बिरजे यांनी स्विट घेतले. संध्याकाळी घरी जाऊन खाण्यासाठी स्विट ओपन केले असता त्यामध्ये आळ्या दिसून आल्या. लागलीच बेंगळूर आयंगार बेकरीत जाऊन जाब विचारला असता बेंगळूर आयंगार बेकरीतील महिला व मालकाने उध्दट उत्तर दिल्यामुळे वादावाद झाला. लागलीच पोलिसात तक्रार करताच नगरपंचायतींच्या आरोग्य अधिकाऱ्यानी चौकशीचा आदेश दिले.
लागलीच पोलिसानी संबंधित नगरपंचायतीने दिलेला परवाना दाखवा असा आदेश दिला. व त्या बेंगळुरू आयंगर बेकरी चालकावर कारवाईचा आदेश बजावला आहे.
आता या बेकरीवर कारवाई होणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागुन आहे
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …