खानापूर (प्रतिनिधी) : डाॅक्टर म्हणजे देव त्याच्या उपचारातून अनेकांना पुर्नजन्म मिळालेला आहे. त्यामुळे डाॅक्टराच्या कार्याचे कौतुक करणे आजच्या काळाची गरज आहे.
नुकताच कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात हाहाकार उडाला. अशावेळी डाॅक्टरानी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या काळात रात्रंदिवस डाॅक्टरानी सेवा केली. जीव धोक्यात घालुन कोरोना रुग्णांची सेवा केली. अशा थोर कर्तबगार डाॅक्टरांचा सत्कार करण्यासाठी जागतिक वैद्यकीय दिनाचे औचित्य साधुन खानापूर येथील सरकारी दवाखान्यात तालुका अधिकारी डॉ. संजय नांद्रे, डॉ. नारायण, तसेच सहकारी डाॅक्टर, नर्स व कर्मचारी वर्गाचा खानापूर तालुका भाजपच्यावतीने सत्कार सोहळा गरूवारी पार पडला.
यावेळी खानापूर तालुका भाजपचे पदाधिकारी, नेतेमंडळी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
