खानापूर (सुहास पाटील यांजकडून) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील खोकी जत-जांबोटी महामार्गाच्या रूंदीकरणावरून व रस्त्याचे डांबरीकरणावरून हालविण्यात आली. जवळपास शंभर एक खोकी, टिपरी मालकाना याचा दणका बसला. त्यामुळे या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. आज तीन महिने झाले. या खोकीधारकांना हाताला काम नाही. हातात खेळत भांडवल नाही. कुटूंबाचे रहाटगाडगे कसे चालवायचे या विचारात खोकीधारक आहेत.
मात्र या संदर्भात तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी, तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यानी याबाबत कधीच साधी विचारपूस केली नाही. की भेट घेऊन यावर कोणता निर्णय घायचा या चर्चाही केली नाही.
एकीकडे कोरोनाच्या महामारीमुळे अव्वाच्या सव्वा दर वाढ झाली आहे. स्वयंपाक गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे दरही गगणाला भिडल्या आहेत. असे असताना बंद पाडलेल्या खोकीधारकांना आजच्या महागाईत दिवस काढणे खूपच कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जांबोटी क्राॅसवरील खोकीधारकाना जगण्यासाठी लोकप्रतिनिधीनी न्याय द्यावा, अशी मागणी होताना दिसत आहे.
तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी जांबोटी क्राॅसवरील रस्ता डांबरीकरण, गटारीचे काम पूर्ण होताच कोणतातरी निर्णय घेऊ असे सांगितले होते.
गेले तीन महिने झाले. जांबोटी क्राॅसवरील खोकीधारकांना रिकामे केले आहे. मात्र जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे डांबरीकरण तसेच गटारीचे काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे ते पूर्ण झाल्याशिवाय या जांबोटी क्राॅसवर खोकीधारकांना न्याय मिळणे कठीण आहे.
तेव्हा आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे डांबरीकरण तसेच गटारीचे काम त्वरीत पूर्ण करून लवकरात खोकीधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …