Wednesday , March 4 2026
Breaking News

९ लाख रू. निधीतून खानापूर नगरपंचायतीकडून हिंदू स्मशानभूमी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या निधीतुन स्मशानभूमीसाठी जागा पाहणी करण्यात आली आहे. कारण खानापूर शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजारहुन अधिक आहे.
शिवाय खानापूर शहराला एकच स्मशानभूमी आहे.
तेव्हा हिंदू स्मशानभूमीसाठी मलप्रभा नदीघाटाजवळील चौदामुशीजवळील जागेवर लाखो रूपये खर्चून हिंदू स्मशानभूमी उभारण्यासाठी सोमवारी नगरपंचायतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित जागेची पाहणी करण्यात आली.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकरसह नगराध्यक्ष मजहर खानापूरी, स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक नारायण मयेकर, विनायक कलाल, आपय्या कोडोळी, नारायण ओगले, प्रकाश बैलूरकर, हणमंत पूजारी, विनोद पाटील, महमद रफिक, नगरसेविका शोभा गावडे, मेघा कुंदरगी, मिनाक्षी बैलुरकर, लता पाटील, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी, सहेरा सनदी, फातिमा बेपारी तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *