खानापूर (प्रतिनिधी) : देवराई (ता. खानापूर) परिसरातील गावाना पाण्याची टंचाई भासु नये. यासाठी काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांनी आपले आजोबा पैगंबरवासी “अब्दुल रहीमान इनामदार” यांच्या स्मरणार्थ देवराई क्षेत्राजवळील परिसरात येणाऱ्या सर्व गावांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे अनावरण केले.
बुधवारी दि. ९ रोजी मोफत पाहणी पुरवठ्याचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना काँग्रेस नेते इरफान तालिकोटी म्हणाले की, लोकाना पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे.
तसेच सार्वजनिक कार्यक्रमाला, लग्न कार्याला व इतर कौटुंबिक सुख दुःखाच्या वेळी मोफत पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले.
यावेळी नुर अहमद इनामदार यांच्या हस्ते व मलापुरी दाबिलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला मारुती इस्रणी, महेश कांबळे, शरीफ इनामदार, महादेव वीर, विठल देसाई, यादू सुतार, श्रीकांत मिराशी, लक्ष्मण चौरी, यलसेट्टी नार्वेकर, तुकाराम वीर, नारायण इस्रानी, फोंडू मंनोलकर, यल्लारी सुतार, हनिफ इनामदार, मुन्ना इनामदार, जुबेर इनामदार, रिजवान इनामार, साबीर इनामदार, तन्वीर इनामदार, जोतिबा तांदळे, सीताराम देसाई इत्यादी गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta