Monday , December 23 2024
Breaking News

खानापूर युवा समिती पाठवणार पंतप्रधानांना अकरा हजार पत्रे!

Spread the love

खानापूर : सीमाप्रश्नाच्या संदर्भातील प्रत्येक लढ्यात जांबोटी भागातील कार्यकर्ते नेहमीच अग्रभागी होते. म्हणूनच या भागाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडे चळवळीला मरगळ आली असताना युवा समितीने नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. इथले युवक युवा समितीच्या प्रत्येक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे आश्वासन जांबोटी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महेश गुरव यांनी दिले.
नुकताच जांबोटीतील श्रीराम मंदिरात म. ए. युवा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
हणमंत जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले.
सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना मराठीबहुल भागात शासनाकडून कानडीकरणाचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. भाषिक अल्पसंख्याकासाठी असणारे सर्व कायदे पायदळी तुडविले जात आहेत. मराठी शाळा, वाचनालये आणि ग्रामीण साहित्य संमेलने बंद पडण्याचे षडयंत्र रचलेले आहे. असे असताना देखील येथील मराठी भाषिक भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकविण्याची कसरत करत आहेत. गेली चौसष्ठ वर्षे खितपत पडलेल्या महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सोडवावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अकरा हजार पत्रे मोदींना पाठवणार आहे. सीमाभागातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विविध भागातून लाखभर पत्रे पाठविली जावीत यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती धनंजय पाटील यांनी दिली.
युवा समिती तालुक्यात विभागवार बैठका घेऊन तरुणांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असून पुढील काळात विभाग प्रमुखांच्या निवडी करणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष किरण पाटील यांनी दिली.
रणजित पाटील यांच्याहस्ते जांबोटी विभागात एक हजार पत्रे देऊन अभियानाची सुरुवात करण्यात आली, आजपासून तालुक्याच्या वेगवेगळ्या विभागात ही कोरी पत्रे वाटण्यात येणार आहेत. ऑगस्ट क्रांतिदिनी ही सर्व पत्रे लिहून विविध भागातून विविध भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली जाणार आहेत
उपाध्यक्ष पिंटू नवलकर, राजू पाटील, मारुती गुरव, राजू कुंभार, दामोदर नाकाडी, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, विशाल बुवाजी यांनी विचार मांडले.
प्रेमानंद झुंजवाडकर, अनिल सुतार, रोशन मोहिते, रवळू कनगुटकर, सुरेश देवळी, काशिनाथ कोवाडकर, नागेंद्र जाधव, दत्त गावकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *