खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात दुसऱ्यांदा गुरूवारी धुवाधार पाऊस झाल्याने पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच हालात्री नदीला, पांढरी नदीला, तिवोली नाल्याला, कुंभार नाल्याला, पाण्याची पातळी वाढली. तसेच गुंजी भागातील आंबेवाडी किरवाळेवच्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या गावाचा संपर्क तुटला. तिवोली नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने संपर्क तुटला.
हबनहट्टी मलप्रभा नदीच्या प्रवाहातील स्वयंभू मारुती मंदिरही पाण्याखाली आहे.
तालुक्यातील विविध गावच्या नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली, तलावानाही पाणी वाढले. तालुका प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला असुन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी मलप्रभा नदीच्या प्रवाहाची पाहणी करून सतर्कतेचा इशारा दिला आहे. खेडोपाडी नागरिकांनी जागृकता पाळावी, अशी सुचना केली आहे.
गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे आहे.
खानापूर: ४० मि. मी;नागरगाळी:५८.४ मि. मी; बिडी:४२.२मि.मी; कक्केरी:४५.४ मि. मी;असोगा:६४.२मि.मी;गुजी : ६२ . २ मि. मी; लोंढा रेल्वे: ७६ मि. मी; लोंढा पीडब्लडी : ७१.८ मि. मी;जांबोटी:९५.२ मि. मी; कणकुंबी: १६८मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …