तालुका पंचायतीचे ईओना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या पीडीओ आरती आंगडी याची मनमानी होत असुन सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जी प्रमाणे कामे करत असून अशा पीडीओ अधिकाऱ्यांची त्वरीत बदली करावी, अशा मागणीचे निवेदन हेब्बाळ ग्रा पं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्याच्या वतीने तालुका पंचायतीचे ईओ अधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. २४ रोजीच्या डिजिटल लायब्ररीचा उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्याना विश्वासात न घेताच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत अध्यक्षाच्या ऐवजी दुसऱ्या गावच्या व्यक्तीचे नाव घालून अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्याचा अपमान केला आहे. याशिवाय आपल्या मर्जी प्रमाणेच व सदस्यांना विश्वासात न घेताच कामे करतात याचा त्रास सर्वाना सहन करावा लागतो. तसेच नागरिकांची कामेही वेळेवर करत नाहीत. नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. वरचेवर गैरहजर असतात. त्याच्या कामाला नागरिकांना वैतागले आहेत. यापूर्वी सुध्दा त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली असून त्यांच्यावर लागलीच कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा मल्लवा मादार, उपाध्यक्ष रवींद्र सुतार, सदस्य संजय पाटील, परशराम घाडी, दिलीप चन्नेवाडकर, प्रकाश गुरव, रूपाली हलगेकर, वैष्णवी काद्रोळकर, पुष्पा आळवणी, अकिता सुतार, नंदा केसरेकर, शितल मजवाळकर, गीता कोलकार, आदी उपस्थित होते.
यावेळी निवेदनाचा स्विकार करून ई ओ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta