खानापूर : शिवाजीनगर खानापूर येथे बस स्थानकाचे उद्घाटन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी काही शालेय विद्यार्थिनींनी डॉ. सोनाली सरनोबत यांना भेटून शिवजीनगरमध्ये बसस्थानक करण्याची विनंती केली. या भागातून अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयासाठी खानापूर शहराकडे ये-जा करत असतात. त्यासाठी रोज विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी केएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शिवाजीनगर येथे बसथांबा मंजूर करून घेतला आणि एक फलक बसवून तात्काळ बस सेवा सुरू करण्यात आली.
यावेळी डॉ. सोनाली सरनोबत, वासू टिप्पनवार, संजू चुंगडे, मेघा मड्डीमनी, रचना गौडर, अशोक हेरेकर, बसवराज कडेमनी, भारती ठाकडी, विनायक नाईक, विद्यार्थी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta