खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा मेळावा मंगळवारी येथील लोकमान्य भवनात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेडीएस नेते ऍड. एच. एन. देसाई होते.
तर मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जेडीएस पक्षाचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम उपस्थित होते. यावेळी जेडीएस नेते नासीर बागवान, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेविका मेघा कुंदरगी, तालुका अध्यक्ष एम. एम. साहुकार, लियाकत बिचणावर, नगरसेवक महम्मद रफिक वारेमणी, रवी काडगी, संजू गोळ, फारूक नाईक, रमीज बागवान, राजू खातेदार, श्री. माडीवाले, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक लियाकत बिचणावर यांनी केले.
तर उपस्थितांचे स्वागत जेडीएस तालुका अध्यक्ष एम. एम. साहुकार यांनी केले.
यावेळी राजाध्यक्ष सी. एम. इब्राहिम, नासीर बागवान व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी मेळाव्यात बोलताना राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम म्हणाले की, राज्यात भाजप सरकार असुन जनतेची कोणती सोय झालेली नाही. डब्बल इंजिन असलेले भाजप सरकार कुचकामी ठरले आहे. तेव्हा आता जेडीएस सरकार राज्यात निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही. कारण काँग्रेसही डळमळीत झाले आहे. तेव्हा खानापूर विधानसभा मतदारसंघातुन जेडीएस उमेदवार नासीर बागवान हे येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच निवडून येणार आहेत. तेव्हा खानापूर तालुक्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून आणावे, असे आवाहन केले.
यावेळी उमेदवार नासीर बागवान म्हणाले की, खानापूर तालुक्यांच्या विकासासाठी, सतत प्रयत्न केले आहे. तालुक्यातील अनेक गावात देवळे उभारली, शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले. गरीब समाजासाठी मदत देऊ केली. तेव्हा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मला भरघोस मतानी निवडून आणाल. असा मला विश्वास आहे. असे मत व्यक्त केले.
यावेळी लियाकत बिचणावर, मेघा कुंदरगी, संजू गोळ, ऍड. एच. एन. देसाई आदीनी विचार व्यक्त केले.
यावेळी जेडीएस पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरव केला.
शेवटी लियाकत बिचणावर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta