खानापूर (प्रतिनिधी) : विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थांच्या ३३ वा राष्ट्रीय क्रिडाकुट २०२२-२३ आयोजित ऍथलेटिक्स २०२२ च्या कुरूक्षेत्र हरियाणा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जवळपास १२०० क्रीडापटूनी सहभाग दर्शविला होता.
या स्पर्धेत तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सात क्रीडापटूनी यश संपादन केले आहे.
यामध्ये ओमकार नांदुरकर याने ४०० मीटर धावणे, अनुष्का कौंदलकर हिने ३००० मीटर चालने, तसेच रिले मध्ये श्री हर्ष, प्रत्यूष, शुभम यानी यश संपादन केले आहे.
तर तेजस्विनी कोळी हिने हातोडा फेकमध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला. तिला रजत पदक देऊन गौरवण्यात आले.
यशस्वी खेळांडुना संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, सचिव प्रा. आर. एस. पाटील यांनी अभिनंदन केले.
तर क्रिडा शिक्षकांचे मार्गदर्शन व प्राचार्या व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta