खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात सर्व प्रथम सुरू करण्यात आलेल्या जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित गुरूवारी दि. ८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेत २०० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता.
यावेळी ५१ स्पर्धकानी २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते.
तर ६० वर्षावरील स्पर्धक सहभागी झाले होते.
सकाळी सात वाजता येथील पारिश्वाड रोडवरील दि. जांबोटी सोसायटीच्या आवारातून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहित रामा, व्दितीय क्रमांक मोनू कुमार तर तृतीय क्रमांक अनंत गावकर अबनाळी (खानापूर) यानी संपादन केले. तर पुढील दहा क्रमांकाचे मानकरी ग्यॅनबाबू दक्षित, शुभम दक्षित, सुरेश बाळेकुंद्री बेळवट्टी, अभिषेक पाल, गोरी चव्हाण, राहुल हसुरकर बेळगाव, निलेश पाटील आदींनी यश संपादन केले
यावेळी बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगावकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, संचालक मनोहर डांगे, यशवंतराव पाटील, मारूती मादार, विद्याधर बनोशी, खाचापा काजुनेकर, विश्व भारती क्रीडा संकुलनचे अनिल देसाई, कार्यदर्शी भैरू पाटील, दामोदर कणबरकर, विनोद गुरव, क्रिडा कोच एल. जी. कोलेकर, गणपत गावडे, राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी, महादेव घाडी, कृष्णा मनोळकर, नगर पंचायत स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, माजी नगराध्यक्ष मजहर खानापूरी, निवृत्त मुख्याध्यापक एल. डी. पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवराच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थापक विलासराव बेळगांवकर म्हणाले की, आमच्या सोसायटीला ३० वर्षे पूर्ण झाली.
यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ही सामाजिक बांधिलकी ओळखून विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे गुरूवारी सकाळी खानापूर पारिश्वाड रोडवरील जांबोटी सोसायटीच्या समोरून मॅरेथॉनला सुरूवात करून जांबोटी रस्त्यावरील मोदेकोप क्राॅसवरून परत खानापूरला मॅरेथॉन स्पर्धेची सांगता झाली.
ही स्पर्धा २१ किलोमीटर होती त्यात ६० वर्षाच्या स्पर्धकांनी भाग घेतला. याचा बक्षिस समारंभ गोवा येथील लोकोत्सव सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते होणार आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन गणपत गावडे यांनी केले. स्पर्धेच्या ठिकाणी केएलईच्या वतीने ऍम्ब्युलन्स डॉ. दिशा पाटील, शिवाजी तुडवेकर आदिंनी मदत केली.
Belgaum Varta Belgaum Varta