Monday , September 21 2026
Breaking News

दोन कारमध्ये भीषण अपघात : भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू

Spread the love

 

मुडलगी : गुर्लापूरजवळील मुधोळ-निपाणी राज्य महामार्गावर बुधवारी रात्री टाटा टियागो कार आणि एर्टीगा कार यांच्यात झालेल्या अपघातात मोठा भाऊ आणि लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.

रायबाग तालुक्यातील कप्पाळगुड्डी गावातील दुंडाप्पा अडिवेप्पा बडिगेर (३४) आणि बहीण भाग्यश्री नवीन कंभार (२२) हे दोघे बुधवारी रात्री धारवाडहून कप्पाळगुड्डी या मूळ गावी जात असताना दोन कारमध्ये धडक झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुंडाप्पा व भाग्यश्री यांचा जागीच मृत्यू झाला असून लोकापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारमधील सहा जणांपैकी चार जणांना गंभीर दुखापत झाल्याने गोकाक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीएसआय एच. वाय. बलदंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
मयत दुंडाप्पा बडिगेर हा अथणी तालुका पंचायतच्या कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *