Thursday , June 4 2026
Breaking News

गुजरातमध्ये भाजपचा विजय; बेळगावमध्ये विजयोत्सव!

Spread the love

 

बेळगाव : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर बेळगावात आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय संपादन केला आहे. त्या आनंदात बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी आज विजयोत्सव साजरा केला. शहरातील चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी पूजा केली. त्यानंतर मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी “भारतमाता की जय” अशा घोषणा दिल्या. त्यानंतर भाजपचे महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजीव गांधींच्या काळात गुजरातमध्ये काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होता. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थ नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भाजपने 150 हून अधिक जागा जिंकून इतिहास निर्माण केला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे असे ते म्हणाले.कर्नाटक निवडणुकीसाठी गुजरातची निवडणूक आदर्श ठरेल. गुजरातमधील विजयाप्रमाणे कर्नाटकातही भाजपचा विजय होईल. हिमालयीन प्रदेशातही आमच्या विजयाची शक्यता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माध्यम समन्वयक शरद पाटील, लीना टोपन्नावर, प्रज्ञा शिंदे, सविता करडी तसेच भाजप महानगर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *