खानापूर (प्रतिनिधी) : गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केले. यानिमित्ताने खानापूरात भाजपच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, किरण यळ्ळूरकर आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले.
यावेळी बोलताना जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, गुजरात विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा मतदारसंघात १५१ जागा विजय मिळवून भाजपची ताकद दाखवून दिली, हिमाचल प्रदेश मतदारसंघातून विजय संपादन केला.
यावेळी पणजी बेळगाव महामार्गावरील शिवस्मारक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून व विजयोत्सवची घोषणा बाजी करून परिसर हादरून सोडला.
यावेळी तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपचे नेते किरण यळ्ळूरकर, तालुका सेक्रेटरी गुंडू तोपीनकट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, युवा नेता पंडित ओगले, मिडीया प्रमुख राजेंद्र रायका, बाळू सावंत, मल्लापा मारीहाळ, आपय्या कोडोळी, गजानन पाटील, जाॅर्डन गोन्सालवीस, बबन आल्लोळकर, अजित पाटील, रवि बडगेर, प्रकाश निलजकर, आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta