खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या कार्यकरिणीची बैठक येथील शिवस्मारक सभागृहात नुकताच पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्यदर्शी संदीप देशपांडे, सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, वासंती बडिगेर, बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, विजय कामत, सुरेश देसाई, आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना विठ्ठल हलगेकर म्हणाले की, पक्ष मोठा करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तनमनधन लावून काम केले पाहिजे. तालुक्यात भाजपला मानाचे स्थान आहे. मात्र पक्षात थोडीशी चुक ही गेल्या पाच वर्षात धोका देऊन गेली. तेव्हा येत्या निवडणुकीत अशी चुक पुन्हा होऊ नये. हीच अपेक्षा आहे.
यावेळी जिल्हा कार्यदर्शी संदीप देशपांडे, सुभाष पाटील, प्रमोद कोचेरी, आदींनी विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात संजय कुबल यानी पक्ष मोठा ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात राहिली पाहिजे. पक्षापेक्षा कोण मोठा नाही. व्यक्ती पेक्षा पक्ष मोठा आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते बाळू सावंत, विजय कामत, पंडित ओगले, अनंत पाटील, लक्ष्मण झांजरे आदींनी विचार व्यक्त केले.
आभार धनश्री सरदेसाई यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta