कायमचा तोडगा काढण्याची मागणी : प्रीतम पाटलांची मध्यस्थी
कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भरण्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी नागरिक यांच्या वाद झाल्याची घटना शुक्रवार तारीख 23 रोजी दुपारी 3 सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेली अनेक वर्षे शुक्रवारी आठवडी बाजार हा जुना बाजारपेठ येथे भरत आहे. बाजार पोलीस स्टेशन पासून मुस्लिम गल्ली, डांगरे गल्ली यादरम्यान भरत आहे. पण या ठिकाणी व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने जुन्या बाजारपेठेत मोठी गर्दी होऊ लागली आहे. मोबाईल, महिलांचे दागिने चोरीचे प्रकार वाढले आहे.
यासाठी भगवा सर्कल चौक ते मुख्य बस स्थानक असा आठवडी बाजार भरवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. पण काही लोक येऊन बाजार हा जुन्या बाजारपेठेतच भरला पाहिजे अशी मागणी करत व्यापाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून बाजारपेठेत नेत होते. यावेळी व्यापारी व नागरिकांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या ठिकाणी माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांनी मध्यस्थी करुन वाद संपुष्टात आणला.
येथील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुख्य बाजारपेठेतील रस्ता माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या फंडातून तयार झाला होता. त्यानंतर हा रस्ता फार खराब झाला आहे. विद्यमान प्रतिनिधींनी हा रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी ही यावेळी केली. त्याचबरोबर बाजारपेठेत अनेकांच्या घराचे काम सुरू असल्याने घरासाठी लागणारे साहित्य सोडण्यात आल्याने व्यापाऱ्यांना बसण्यासाठी अडचण होऊ लागली आहे.
प्रितम पाटील यांनी अंबिका मंदिर ते मुख्य बस स्थानक व बाजारपेठ असा बाजार सुरु करा. शुक्रवारी मुख्य रस्ता बंद ठेवण्यात यावा अशी सूचना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना केली.