खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री. परशुरामअण्णा गुरव हे होते. तर तर क्रीडा शाखेसह विविध सांस्कृतिक विभागांचे उद्घाटन मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून श्री. नागराज यादव एमएलसी, विधान परिषद तथा काँग्रेस प्रवक्ते, बेंगलोर हे उपस्थित होते.
याप्रसंगी ते बोलताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, “आधुनिक काळात नाविन्यतेची कास धरत आपण ज्ञानार्जन केले पाहिजे. समाज सुधारणा ही आधी आपल्यापासून सुरू होत असते. त्यामुळे आपण कसे चारित्र्यवान होऊ याकडे विद्यार्थ्यांचा कल असावयास हवा. ज्या भूप्रदेशात आपण राहतो तेथील हवा, पाणी, भाषा यांच्यावर नितांत प्रेम केले पाहिजे. शिवाय धर्म, भाषा या माध्यमातून भारतीय एकात्मतेला बाधा येऊ नये आपण एकसंघ राहिले पाहिजे. कारण भारतीय संस्कृती ही पुरातन आणि जगाला ज्ञान देणारी आहे. विश्व कल्याणाचे स्वप्न घेऊन उभारलेला भारत भविष्यात जगाचे नेतृत्व करावयाचा असेल तर आपण उज्वल पिढी घडविणे आवश्यक आहे. हाच विचार मनी ठेवून मराठा मंडळ संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. श्री. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांनी मोठी दूरदृष्टी ठेवून खानापूर सारख्या दुर्गम प्रदेशात केलेली शैक्षणिक सेवा ही फार मोठी गोष्ट आहे. असे आदर्श आपण जपले पाहिजेत.” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते अनेक आजी माझी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी यांनी स्वागत व प्रस्ताविकांने केली. ईशस्तवन व स्वागत गीत महाविद्यालयाची जनरल सेक्रेटरी कुमारी माहेश्वरी नांदूडकर हिने सादर केले. मान्यवरांचा परिचय कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. जे. बी. अंची यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. एम. तिर्लापूर व प्रा. पांडुरंग भातकांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता क्रिडाशिक्षक प्रा. कपिल गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावर्षीचे क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष प्रा. वाय. एस. धबाली यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग इतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta