बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने येत्या 8 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या भव्य कुस्ती आखाड्याच्या पूर्व तयारीसाठी आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदवाडी आखाड्यात जाऊन आखाड्याची पाहणी केली.
यावेळी अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरतन सिंग पनवार, पप्पू होनगेकर, संतोष होंगल, शुभम नांदवडेकर, संजय चौगुले, नरहरी माळवी, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.