Sunday , February 9 2025
Breaking News

केंद्र सरकारकडून कळसा-भांडुरा प्रकल्पाला परवानगी

Spread the love

 

बेळगाव : कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय जलविद्युत मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.

विधानसभेत बोलताना कारजोळ म्हणाले, कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु होता. बसवराज बोम्मई यांच्यासारखे नेतृत्व कर्नाटकाला मिळाले नसते तर या प्रकल्पाचा तिढा सुटला नास्ता. बोम्मई हे उत्तम प्रशासक आहेत, तांत्रिक तज्ज्ञ आहेत, सिंचन तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीपीआरमध्ये सुधारणा झाली आणि केंद्राने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला.

जलाशयाची उंची कमी करण्यासाठी कळसामध्ये १.७२ टीएमसी आणि भांडुरा मध्ये २०१८ टीएमसी असे एकूण ३.९ टीएमसी पाणी वापरण्यासाठी सुधारित डीपीआर सादर केला. यासाठी अनेकवेळा आपण दिल्ली वाऱ्या केल्या.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः जलविद्युत मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्र्यांची अनेकदा भेट घेतली. आणि त्यांच्या प्रयत्नामुळे या प्रकल्पाला यश मिळाले.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही आपल्याला पाठिंबा दिला, हि बाब कर्नाटकासाठी उत्तम असल्याचेही कारजोळ म्हणाले. या प्रकल्पासाठी प्रयत्न केलेल्या अधिकाऱ्यांचे आणि आंदोलकांचे पालकमंत्र्यांनी आभिनंद केले.

About Belgaum Varta

Check Also

बँक फसवणूक प्रकरण; भाजपचे माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांची शिक्षा

Spread the love  बंगळूर : ७.१७ कोटी रुपये बँक फसवणूक प्रकरणात गुरुवारी एका विशेष न्यायालयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *