निपाणी : आटपाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये येथील तेजस्विनी रमेश तोरस्कर हिने प्रथम क्रमांक मिळविला. अमृतसर (पंजाब) येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तर राष्ट्रीय नेट बॉल स्पर्धेत हरियाणा राज्य मध्ये मारिया सुतार हिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
त्यानिमित्त माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रमेश तोरसकर, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, माजी सभापती किरण कोकरे, एम. डी. रावण, ॲड.संजय चव्हाण, बबन चौगुले, अशोक लाखे, चंद्रकांत चव्हाण, झुंजार धुमाळ, बाबू मुल्ला, सईद मलिक, अभिजित धुमाळ, विकास सुतार, विजय लाखे, आनंदा स्वामी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.