
खानापूर : धर्मभूषण पू सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपा आशीर्वादाने संत समाज कुप्पटगिरी येथे विशेष संतसमागम 31/12/22 रोजी मोठ्या उत्साहात सुसंपन्न झाला. यावेळी यजमान म्हणून सौ. व श्री. कृष्णा पाटील हे लाभले. यावेळी सद्गुरू पाद्यपूजा, सामुदायिक भजन प्रार्थना व समाज प्रबोधन अशा प्रकारे हा सोहळा साजरा झाला. संत समाज दांडेली, रामगुरवाडी- इदलहोंड, शाखा गोल्याळी मधील शिष्यगण भाविक उपस्थित होते. कुप्पटगिरी संत समाजाचे अध्यक्ष विश्वास किरमटे यांनी सर्वांचे स्वागत प्रास्ताविक केले.
दिप प्रज्वलनाने हा सोहळा सुरू झाला. व्यासपीठावर डॉ. गौरेशजी भालकेकर यांनी उद्गाता सेवा सद्गुरू चरणी समर्पित केली. यावेळी प्रा. सदानंद गावस यांनी सद्गुरू महात्म्य व स्वधर्म कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याची गरज याबद्दल प्रबोधन केले. सूत्रसंचालन जोतिबा पाटील यांनी केले. सद्गुरू महाआरती, सद्गुरू प्रदक्षिणा, तीर्थ प्रसाद व महाप्रसादाने या सोहळ्याचा समारोप झाला.
Belgaum Varta Belgaum Varta