Sunday , December 14 2025
Breaking News

भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल सानिका पाटीलचा सत्कार

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : लोकोळी (ता. खानापूर) गावची कन्या व श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी सानिका संजय पाटील हिची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल हायस्कूलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील व सर्व शिक्षकांच्या हस्ते शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
भारती सैन्य दलात निवड झाल्याबद्दल श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थांचे चेअरमन वाय. एन. मजुकर व सचिव प्रसाद मजुकर यांनी अभिनंदन केले.
सानिका पाटील ही लहानपणापासून हुशार विद्यार्थी म्हणून ओळखली जात होती. तिच्या या निवडीमुळे तिचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामेळावा : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात!

Spread the love  बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *