खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सर्व एनपीएस आणि ओपीएस सरकारी कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, गुरूवारी दि. ५ रोजी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना कर्नाटक राज्य एनपीएस नोकर संघटना तालुका घटक खानापूर यांच्या वतीने बहिष्कार घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. यामध्ये आम्हाला कोणत्याही संघटनेची अथवा व्यक्तीची भावना दुखवायचा हेतू नसून सध्या जी एनपीएसची चळवळ संपूर्ण राज्यभर निर्णायक क्षणी पोहोचलेली असताना आमच्या भविष्याच्या आणि अस्तित्वाच्या लढायचा काळ असल्याकारणाने राज्य संघटनेच्या आदेशानुसार आम्ही सध्या अशा सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांना बहिष्कार घालत आहोत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील सर्व एनपीएस व ओपीएस कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे.
राज्य संघटनेचे सहकार्य नव्हते
बेंगलोर येथे चाललेल्या करा व मरा आंदोलनासाठी राज्य सरकारी नोकर संघटनेने कोणतेही सहकार्य केलेले नव्हते. शिवाय त्या आंदोलनाची चेष्टा करण्यातच काही पदाधिकाऱ्यांनी धन्यता मानली होती. त्यासाठी सर्व एनपीएस नोकरदारांनी या क्रिडास्पर्धांचा बहिष्कार करण्याचे सर्वानुमते ठरवलेले आहे. तेव्हा एनपीएस लतसेच ओपीएस कर्मचाऱ्यांचे गांभीर्य लक्षात घेवून हा संदेश राज्य सरकारी नोकर संघटनेला तसेच सरकारला “एनपीएस” हटवून “ओपीएस” व्हावी अशी आमची तीव्र भावना पोचवण्यासाठी या स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये, असे तालुका एनपीएस संघटनेचे गौरवाध्यक्ष जे. पी. पाटील, किरण पाटील, एस. वाय. पाटील, तसेच अध्यक्ष रमेश कवळेकर, प्रधान कार्यदर्शी जी. पी. केरीमठ, उपाध्यक्ष- बापू दळवी, खजिनदार- विठ्ठल बिळमरी आदींनी केले आहे.