खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत नगर विकास टप्पा चार मधील रस्ते व गटारीची कामे सुरू करण्यास विलंब लावणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच ही कामे त्वरीत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचातीचे नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी नगरविकास खात्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे नुकतीच करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर शहरातील रस्ते व गटारीसाठी मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत दोन महिन्यापूर्वी १ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाचा ठेकाही ही देण्यात आला. मात्र दोन महिने ओलांडले तरी ही ठेकेदारांने कामाला सुरूवात केली नाही. या संदर्भात खानापूर नगर पंचायतीने दोन वेळा नोटीसा बजावली आहे. तरी सुद्धा ठेकेदाराने काम सुरू केले नाही. याची चौकशी करून सबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच काम तातडीने सुरू करावे अशी मागणी अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक आप्पाया कोडोळी, रफिक वारिमनी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta