Monday , April 20 2026
Breaking News

शिवगर्जना महानाट्य प्रवेश पासचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड (ता. खानापूर) येथे भाजपच्या बुथ विजयी दिन आयोजित कार्यक्रमात तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप व तालुका भाजपच्या वतीने येत्या दि. ७ ते १० जानेवारी रोजी होणाऱ्या शिवगर्जना महानाट्याच्या प्रवेश पासचे अनावरण बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, राजाचे रयत मोर्चा राज्याध्यक्ष इराणा कडाडी, भाजप जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर, तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, धनश्री सरदेसाई, सुभाष गुळशेट्टी, जिल्हा रयत मोर्चा अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, तालुका रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तिरवीर, मिडीया प्रमुख राजेंद्र रायका आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात.
यावेळी खानापूर तालुक्यातील जनतेला शिवाजी महाराजाचा इतिहास समजावा तसेच शिवाजी महाराजाचा राजाभिषेक याची माहिती व्हावी. हा उद्देश असुन केवळ वाढदिवसाचे निमित्ताने हा शिवगर्जना महानाट्य प्रयोग मोफत पाहण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी पहिले दिवशी मोफत पास देण्यात येणार आहे. त्या पासचे अनावरण बेळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी शिवगर्जना महानाट्याचा लाभ खानापूर तालुक्यातील जनतेने घ्यावा, असे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कु. सबीना लुईस लोबो हिचा गौरव

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातच नव्हे तर बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्यात आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *