खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी हॉस्पिटलच्या सिनियर हेल्थ केअर अधिकारी सौ. ललिता यशवंत गडकर या ३७ वर्षांच्या सेवेतून निवृत झाल्या.
त्यानिमित्त खानापूर सरकारी हाॅस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी निवृत्त शिक्षक गणपत नार्वेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले आहे
सिनियर हेल्थ केअर अधिकारी सौ. ललिता गडकर यांच्या सेवेला सुरुवात १९८६ साली झाली. त्यानंतर त्यांनी हलशी सरकारी दवाखान्यात सेवा बजावली. तेथून २०१६ मध्ये बदली लोंढा सरकारी दवाखान्यात झाली. २०१९ मध्ये गणेबैल सरकारी दवाखान्यात बदली झाली. तेथून त्यांना सिनियर हेल्थ केअर अधिकारी म्हणून बढतीवर खानापूर सरकारी दवाखान्यात हजर झाल्या व डिसेंबर २०२२ साली त्या सेवानिवृत्त झाल्या.
यावेळी सेवानिवृत्त निमित्त कार्यक्रमाला खानापूरचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे, डाॅ. नारायण वड्डिमनी, डॉ. किनगी, डॉ. नदाफ, डॉ. बावचे, डॉ. राजश्री बसगौडा, डॉ. अर्चना, तसेच आप्तेष्ट सुरेश सांगली, बाबू सौंदती, खानापूर शहरातील नागरीक, मित्र मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार गणपत नार्वेकर यांनी मानले.