खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शेत जमिन नसलेल्या निवृत्त भारतीय सैनिकांना पाच एकर जमीन मिळावी. यासाठी गेली १५ वर्षे अर्ज करून आजतागायत अद्याप जमिन मंजूर करण्यात आली नाही. तेव्हा अर्ज केलेल्या सेवानिवृत्त माजी भारतीय सैनिकाना पाच एकर जमिन मिळावी. अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ भाजपचे नेते आनंदराव पाटील व श्री. गोळेकर यांनी खासदार श्रीमती मंगला अंगडीना यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सैन्यात कित्येक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्ती नंतर ज्या सेवानिवृत्त सैनिकाना जमिन नाही. अशा सैनिकाना पाच एकर जमिन द्यावी. यासाठी गेली पंधरा वर्षांपासून अर्ज करून अद्याप जमिन मिळाली ती त्वरीत मिळावी असे म्हटले आहे.
यावेळी खासदार श्रीमती मंगला अंगडी यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप नेते आनंदराव पाटील, श्री. गोळेकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta