खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (खानापूर) गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवस्थान हे प्रसिद्ध तिर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 12 व्या शतकापासून सर्वात जुने व प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे वर्षातून एकदा मंदिराच्या पवित्र विहिरीत धार्मिक विधी केल्या जातात.
याचे महत्व कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात आहे. लाखोभक्त दर्शनासाठी ये-जा करतात. हे देवस्थान 1951साली ट्रस्टी नावे आहे. असे असताना या देवस्थानावर युवराज एस. क्रुतकोटी याने आपल्या नावे ट्रस्टची नोंद करून या ट्रस्टचा अध्यक्ष युवराज एस. क्रुतकोटी असून त्याचाच मुलगा विक्रांत युवराज क्रुतकोटी हा सेक्रेटरी आहे. त्यामुळे देवस्थानावर कब्जा करण्याचा त्यांचा हा कुटील डाव आहे. या देवस्थानची मालमत्ता विक्रांत क्रुतकोटी नावे गिफ्टेड डीड करून नविन ट्रस्टी करण्यात आली आहे.
याची तहसीलदारांनी जातीनीशी शहानिशा करून कणकुंबी देवस्थानचा कब्जा हा गावच्या देवस्थान कमिटीच्या नावे व्हावी व त्यांच्यावर तक्रार दाखल करावी.
यासाठी 15 सप्टेंबर रोजा ग्रामस्थांनी बैठक घेऊन सोमवारी दि. 27 रोजी यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर केले.
यावेळी निवेदन देताना लक्ष्मण गावडे, राजाराम गावडे, हणमंत गावडे, अंकूश गावडे, शिवाजी दळवी, प्रकाश नाईक, लिंगापा घाडी, प्रभाकर पंडित, शांताराम गवस, कृष्णा नाईक, दत्ता गावडे, रमेश खोरवि, रवि नाईक, विष्णू नाईक, तसेच महिला व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदनाचा स्विकार करून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आस्वासन दिले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …