खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शुभम गार्डन हॉलमध्ये बेळगाव एलआयसी ऑफ इंडिया ब्रांच वन व सॅटलाईट ऑफिस खानापूर यांच्यावतीने एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून एलआयसी एजंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून चंदगड येथील एम डी आर टी एजंट अशोक दळवी यांना बोलावण्यात आले होते. त्याचबरोबर व्यासपीठावर एलआयसीचे चीफ मॅनेजर नंदकुमार सर व सॅटलाईट ऑफिसचे ब्रांच मॅनेजर देवेंद्र कमदगी सर त्याचबरोबर असोसिएशनचे सेक्रेटरी अनिल पुजारी खजिनदार वासु सामजी सर होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. दिप्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते झाले व स्वागतगीत सुजाता बेळगावकर मॅडम यांनी केले आणि प्रास्ताविक जगदीश जळके सर यांनी केले. चीफ मॅनेजर व ब्रांच मॅनेजर यांनी नवीन आलेल्या प्लॅन बद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर प्रमुख वक्ते अशोक दळवी चंदगड यांचे एलआयसी एजंटना मार्गदर्शन झाले त्याच बरोबर एलआयसीचे डेवलपमेंट ऑफिसर जेसन फर्नांडिस किरण कामत व एस एन सरदेशपांडे साहेब उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण प्रदीप पाटील सरांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण गुरव व महेश कदम यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन एलआयसी एजंट लक्ष्मण गुरव यांनी केले कार्यक्रमाला शांताराम बिडकर यशवंत देसाई, महेश कदम, प्रकाश कोवाडकर, सुधाकर वारके, दीपक कोडचवाडकर, मारुती पाटील व खानापूर व बेळगाव येथून शेकडो एलआयसी एजंट बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta