Monday , September 21 2026
Breaking News

आर.पी.डी. कॉलेजला नॅककडून ‘ए’ श्रेणी

Spread the love

 

बेळगाव : साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला नॅक त्रिसदस्यीय समितीने चौथ्या तपासणीतून ‘A’ ग्रेड (3.16 सीजीपीए) देऊन सन्मानित केले आहे. नॅक समितीने ८ आणि ९ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाला भेट दिली होती. या समितीत कलिंगा विद्यापीठ, रायपूर- छत्तीसगडचे उपकुलगुरू डॉ. बायजू जॉन अध्यक्ष होते. तर हैदराबाद विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे डॉ. राघव रेड्डी चंद्री सदस्य समन्वयक आणि रहेजा कला आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई प्राचार्य डॉ. देबाजित सरकार यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.
नॅक समितीचे एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यानी गार्ड ऑफ ऑनरने स्वागत केले. त्यानंतर प्राचार्या डॉ. अनुजा नाईक, आयक्यूएसी समन्वयक डॉ. अभय पाटील यांनी महाविद्यालायाच्या गत पाच वर्षाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. समितीने बी. कॉम, बी.बी.ए., मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास विभागांना भेट दिली. क्रीडा, एन एस एस, एन सी सी, वाय आर सी, स्काउट आणि गाईड, विद्यार्थी कल्याण विभाग, हॉबी सेंटर, ग्रंथालय, भाषा प्रयोगशाळेला देऊन सर्व सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. व्यवस्थापन समिती, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी वर्ग, पालक वर्ग, आजी – माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *