खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील यल्लम्मा भक्त दरवर्षी सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनाला जातात. त्याप्रमाणेच मोदेकोप (ता. खानापूर) येथील रेणुका देवीचे भक्त सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेवरून मोदेकोप गावाला आले. यल्लम्मा यात्रेवरून आलेल्या जवळपास ३५ भक्तांना अन्नातून विषबाधा झाली. लागलीच त्यांना खानापूर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व लागलीच त्याच्यावर डाॅ. तोडकर यांनी उपचाराला सुरूवात केली.
या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, भाजप युवा नेते पंडित ओगले तसेच भाजपचे प्रसारमाध्यम प्रमुख राजेंद्र रायका आदींनी भेट देऊन चौकशी केली. विषबाधा झालेल्या रुग्णाना धीर दिला.
यावेळी मोदेकोप गावचे व माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर यांनीही सरकारी दवाखान्यात राहुन रुग्णाची काळजी घेतली.
या विषबाधा झालेल्या रुग्णाना अतिसार व उलटी होत होती. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असुन प्रकृती धोक्या बाहेर आहे.
Belgaum Varta Belgaum Varta