खानापूर : ता. खानापूर मौजे शेडेगाळी येथील गावच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. पूर्वीचा नामफलक हा गेले चार महिने जमीनदोस्त होऊन पडलेला होता परंतु या नामफलकाकडे ग्रामपंचायतचे लक्ष देखील नव्हते. ग्रामपंचायतचे पी डी ओ यांना शेडेगाळी गावचे ग्रामपंचायत सदस्य यांनी वारंवार निवेदन देऊन देखील त्या नामफलकाची दखल घेतली नव्हती. शेवटी गावातील हिंदुस्तान शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नामफलकाचे अनावरण करण्याचे ठरवले व गावातील तरुण वर्गाकडून मदतीचे हात मागून एक सुंदर असा नामफलक तयार करण्यात आला व त्याचे अनावरण दिनांक 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. गावातील तरुणांचे हे कार्य पाहून गावामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले व पुढील कोणत्याही कार्याला गावातील तरुण वर्ग पुढाकार घेऊन त्या समस्या सोडवण्याची ग्वाही सर्व तरुण वर्गाने दिली.
Belgaum Varta Belgaum Varta