Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूरात शिरशी-बेळगाव बस ड्रायव्हरला मारहाण

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ शिरशीहून बेळगावकडे जाणाऱ्या बसला आडवून ड्रायव्हरला मारहाण करून रक्तबंबाळ केले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरशीहून बेळगावकडे जाणारी शिरशी- बेळगाव बस खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ आली असता मागुन आलेल्या कारमधुन काही युवकांनी बस थांबवुन ड्रायव्हरला मारहाण केली. यात त्याच्या नाकाला जबर मारहाण झाल्याने रक्तबंबाळ झाले. सदर बस ड्रायव्हर मारूती सुर्यकांत कुंभार राहणार गर्लगुंजी गावचा असुन त्याने खानापूर पोलिस स्थानकात युवकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंद करून बस ड्रायव्हरला उपचारासाठी बेळगावला पाठविले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

चन्नेवाडीच्या युवकांचे कौतुकास्पद कार्य

Spread the love  खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील बसशेड हे गेली कित्येक वर्षे रंगरोटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *