खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भारत स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय पदयात्रेला मंगळवारी दि. १४ रोजी जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावरून प्रारंभ झाला.
प्रारंभी बीईओ राजेश्वरी कुडची, क्षेत्र समन्वय अधिकारी ए आर आंबगी, पी ई ओ श्रीमती मिरजी तसेच डाॅ डी ई नाडगौडा आदी हिरवा निशाना दाखवुन पदयात्रेला चालना दिली.
यावेळी पदयात्रा परिश्वाड क्रॉस बाजार पेठेतून निघून शिवस्मारक येथे मानवी साखळी करण्यात आली. खानापूर तालुक्यातील २५० हून विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्व स्काऊट मास्टर्स गाईड कॅप्टन आणि तालुका सचिव एस. के. बेंडीगेरी राजव इतर पदाधिकाऱ्यांनी मुलांना या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले होते. आणि पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा देत मुले मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन रॅलीचा समारोप कुमार कुंभार आदीनी बीआरसी कार्यालयाच्या आवारात पदयात्रेची सांगता केली.
Belgaum Varta Belgaum Varta