Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरात शिवजयंतीनिमित्त १९ रोजी इरफान तालिकोटी ग्रुपच्या वतीने डान्स, गायन स्पर्धा

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या वतीने खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन रविवारी दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील सर्वोदय इंग्रजी हायस्कूलच्या पटांगणावर ग्रुप डान्स व गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील युवा पिढीला तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा विद्यार्थी वर्गासाठी चांगले व्यासपीठ मिळावे. त्याच्या चांगल्या गुणाना वाव मिळावी. या उद्देशाने खानापूर काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांनी स्वतः या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयी स्पर्धकांना बक्षिसे पुढील प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहेत.

ग्रुप डान्स बक्षिसे पुढील प्रमाणे

ओपन स्टेट लेव्हल
पहिले बक्षिस २२,२२२ रूपये, दुसरे बक्षिस १५,५५५ रूपये, तिसरे बक्षिस ११,१११ रूपये.

हायस्कूल लेव्हल फक्त खानापूर तालुका
पहिले बक्षिस १५,५५५ रूपये, दुसरे बक्षिस ११,१११ रूपये, तिसरे बक्षिस ७,७७७ रूपये,

हाय्यर प्राथमिक स्कूल लेव्हल
पहिले बक्षिस १५,५५५ रूपये, दुसरे बक्षिस ११,१११ रूपये, तिसरे बक्षिस ७,७७७ रूपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत

गायन स्पर्धेसाठी बक्षिसे पुढील प्रमाणे

ओपन स्टेट लेव्हलसाठी
पहिले बक्षिस ७,७७७ रूपये, दुसरे बक्षिस ५,५५५ रूपये, तिसरे बक्षिस ३,३३३ रूपये

हायस्कूल लेव्हल फक्त खानापूर तालुक्यासाठी
पहिले बक्षिस ५,५५५ रूपये, दुसरे बक्षिस ३,३३३रूपये, तिसरे बक्षिस २,२२२ रूपये अशी भव्य बक्षिसे देण्यात येणार आहेत.

यावेळी स्पर्धेसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती खानापूर काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांनी बोलताना दिली.

तेव्हा स्पर्धकांनी याचा लाभ घ्याव, असे आवाहन यावेळी खानापूर काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *