खानापूर : बेळगाव येथील आपले काम संपवून घरी परतत असताना बेळगाव – खानापूर महामार्गावरील निट्टूर क्रॉस येथील ब्रीजवर अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस्वाराला ठोकरल्याने राजु धबाले (वय अंदाजे 42 वर्षे) मुळ गाव तळेवाडी ता. खानापूर हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अपघातात ठार झालेले राजु सातेरी धबाले मुळ गाव तळेवाडी असुन सध्या ते आपल्या पत्नीच्या गावी गणेबैल येथे रहात होते व तेथून दररोज गणेबैल येथून उद्यमबाग येथे कामाला जात होते, आज सुध्दा नेहमीप्रमाणे उद्यमबाग येथील आपले काम संपवून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर मारली असता ब्रीजवरील भिंतीवर आढळल्याने डोकीला मार बसून जागीच ठार झाले.
राजु धबाले यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असून घडलेल्या या दुदैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खानापूरचे सीपीआय रामचंद्र नाईक, कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर, कॉन्स्टेबल मंजूनाथ मुसळी यांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठविला असून, पुढील चौकशी व अज्ञात वहानाचा तपास खानापूर पोलीस करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta