खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारक करत आहेत गाळ्यांची प्रतिक्षा.
याबाबतची माहिती अशी की, गेल्या सहा महिन्यापासून जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारक अद्याप अंधारातच आहेत. रस्ता रूंदीकरणाचे कारण पुढे करून जांबोटी क्रॉसवरील 51 गाळेधारकांना उधळून लावले. गेल्या सहा महिन्यापासून गाळेधारक कामाविनाच जगत आहेत. त्यांच्या कुटुंबाना दोन वेळेचे पोट कसे भरावे. असा प्रश्न पडला असताना सहा महिन्यापासून जांबोटी क्रॉसवरील गाळ्यांबाबत कोणताच निर्णय झाला नाही. अद्याप जांबोटी क्रॉसवरील रस्त्याचे कामही अर्धवट सोडण्यात आले आहे. या भागातील डांबरीकरण, गटारीचे कामही अर्धवट सोडण्यात आले आहे. जेसे दिवस जातील तसे गाळेधारकावर अनेक संकटे ओढत आहे.
गटारीच्या निमित्ताने गाळे उडविले
जांबोटी क्रॉसवरील जवळपास 51 गाळेधारकांनी प्रत्येकी 30 हजार रूपये खर्च करून गाळे उभारले. मात्र कोणतीच माणुसकी न दाखवता गाळ्यांची मोडतोड करून गाळे उधळून लावले. याकडे लोकप्रतिनिधींची सहानुभूती दिसून आली नाही. त्यामुळे गाळेधारकांतून नाराजी पसरली आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …