खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार होत नाही. त्यामुळे स्वच्छता कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा वेळेत स्वच्छता कामगारांना पगार द्यावा. तसेच नोकरीत कायम करून स्वच्छता कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वच्छता कामगारांनी केली.
मागील बैठकीत चिफ ऑफिसराना वाहनाची व्यवस्था व्हावी. अशी चर्चा करण्यात आली. एकीकडे स्वच्छता कामगारांना वेळेत पगार होत नाही. तर दुसरीकडे चार चाकी वाहनाची व्यवस्था कशी केली जाणार. नविन चार चाकी वाहनाची किमत लाखोच्या घरात आहे.
नगरपंचायतीची वसुली मोजकीच होते. असे असताना स्वच्छता कामगारांना पगार देताना तारेवरची कसरत होते. नगरपंचायतीकडून महिन्याला शहरातील गाण्याची वसुली करून स्वच्छता कामगारांना वेळेत पगार द्या. चीफ ऑफिसराच्या वाहनाची व्यवस्थेसाठी पहाटे उठून शहरातील कार्याची उचल करणार्या स्वच्छता कामगारांचा प्रथम विचार करून महिन्याच्या महिन्याला त्याना पगार द्या, अशी मागणी स्वच्छता कामगारांतून होताना दिसत आहे.