खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षापासून विद्यानगरात गटारीचे व रस्त्याची कामे झाली नाहीत. परंतु नुकताच खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील विद्यानगरात सर्वे नंबर ९२ मधील वसाहतीत नगरपंचायतीच्या वतीने या भागाचे नगरसेवक विद्यमान नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करून गटारी व सीडीचे विकास काम नुकताच करण्यात आले आहे.
यापुढेही उर्वरित गटारीचे कामे व रस्त्याची विकास कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
यासाठी या भागाचे नगरसेवक विद्यमान नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी निधी उपलब्ध करून लागलीच गटारी, रस्ते आदी कामे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती दिली.
विद्या नगरातील गटारी, सीडीचे विकास कामे झाल्यामुळे येथील नागरिकांतून समाधान पसरले आहे.
यापुढेही सर्वे नंबर ९२ मध्ये पथदिवे, गटारी, रस्ते, सीडी तसेच पाण्याचा पाण्याचा विकास होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी बोलताना दिली.
Belgaum Varta Belgaum Varta