खानापूर : खानापूर जेडीएसचे अधिकृत उमेदवार नासीर बागवान यांनी आपल्या समर्थकासोबत नामपत्र दाखल केले आहे. सोमवारी श्री छत्रपती शिवाजी स्मारक येथे येऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नामपत्र दाखल करण्यासाठी खानापूर तहसीलदार कार्यालयाकडे प्रयाण झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना उमेदवार नासीर बागवान म्हणाले की, खानापूर तालुक्याचा दुर्दैव आहे की, खानापूर या पवित्र भूमीमध्ये जवळपास 15 नद्यांचा उगम झालेला असून देखील या भागातील जनतेला पाण्यासाठी वन वन फिरावे लागते. यासाठी म्हणून येत्या काळात आपण जनतेला अर्थात शेतकरी वर्गाला मुबलक पाणी कसे उपलब्ध करता येईल याकडे आपण जातीने लक्ष देणार असल्याचे यावेळी सांगितले. या व्यतिरिक मागील निवडणुकीमध्ये आपण थोड्याच फरकाने हरलो असलो तरी या वेळेला मात्र मला बहुमताने जनता निवडून देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. नामपत्र दाखल करतेवेळी बसव प्रभू हिरेमठ, ग्रामीण अध्यक्ष विशाल पाटील, अलीम अख्तर नाईक, जिल्हा उपाध्यक्ष एल टी बिचनवर, जेडीएस महिला घटक जिल्हाध्यक्ष मेघा कुंदर्गी, मजर खानापुरी, रफिक बारीमनी, रेवनसिद्धया हिरेमठ, आर एस पाटील, जगदीश गौडा पाटील, जेडीएस उपाध्यक्ष नागराज हुबळी, एम एम सावकार, फारुख नाईक, मोहद्दीन दावणगिरी, मन्सूर तहसीलदार, अल्ताफ खानापुरी, देवेंद्र कवी सह आणि एक पदाधिकारी व कार्यकर्ते नाम पत्र दाखल करतेवेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta