Monday , December 8 2025
Breaking News

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून त्वरित नुकसान भरपाई द्या

Spread the love

खानापूर युवा समितीचे उप वन संरक्षणाधिकाऱ्याना निवेदन आंदोलनाचा इशारा

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यात वनप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांची अशी नासाडी होत असल्याने शेतकरी हतबल झाला असून वनखात्याने त्वरित वनप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदनत खानापूर तालुका म. ए. युवा समितीकडून उप वनसंरक्षणाधिकारी एम. कुसनाळ यांना दिले.

तालुक्याचा निम्मा भाग वन प्रदेशात आहे. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान दरवर्षी ठरलेले असते. हत्ती, रानगवे, डुक्कर, साळिंदर आणि वानर यांच्याकडून हातातोंडाला आलेली भुईमूग, ऊस आणि भातपिके मोठ्या प्रमाणात नष्ट केली जात आहेत. जंगलात वनप्राण्यांसाठी आवश्यकता असणारे अन्न मुबलक प्रमाणात तयार करण्यात वनखाते कुचकामी ठरले आहे. परिणामी अन्नाच्या शोधात आलेले वनप्राणी शेतीची नासाडी करीत आहेत.
त्याकरिता शाश्वत उपाययोजना करावी व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी बोलतांना युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले, कणकुंबी येथे विजेच्या तारेच्या स्पर्शाने रानगवा दगावल्यानंतर ज्या तत्परतेने हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली, तीच तत्परता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दाखवावी. शेतकऱ्यांना तुटपुंज्या भरपाईने खुश करण्याचा आटापिटा बंद करावा व वाढीव भरपाई द्यावी अन्यथा युवा समिती तीव्र आंदोलन हाती घेईल असा इशारा यावेळी दिला.

यावेळी कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, एपीएमसी सदस्य मारुती गुरव, ग्रा. पं. सदस्य रणजित पाटील, राजू पाटील, ज्ञानेश्वर सनदी, भूपाल पाटील, विलास बेडरे, राजाराम देसाई,
विशाल बुवाजी, अर्जुन गावडे, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते. एसडीए दीपा हेरेकर यांनी निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!

Spread the love  आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *