Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठलराव हलगेकर विजयी

Spread the love

 

खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीतील खानापूर मतदार संघात भाजपचे उमेदवार विठ्ठलराव हलगेकर यांनी ९१७७५ मते घेऊन विजय संपादन केला. यांच्या विजयाने खानापूर शहरासह तालुक्यात विजयोत्सव साजरा झाला. शनिवारी दि. १३ रोजी बेळगांव येथील आर पी डी काॅलेज मध्ये मतमोजणी पार पडली.
यावेळी खानापूर मतदार संघातून भाजपचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. याची बातमी खानापूर शहरासह तालुक्यात पसरताच शहरासह तालुक्यात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव करताना भाजप कार्यकर्ते बेफाम झाले होते.
दुपार पासुन तालुक्यात विजयोत्सव करताना भाजप कार्यकर्ते गुलालच्या उधळणात नाहुन निघाले होते.
खानापूर मतदार संघातील १३ उमेदवारांची मते
विठ्ठलराव हलगेकर ९१७७५ मते (विजयी), अंजली निंबाळकर ३७१९३ मते, नासीर बागवान १५४८६ मते, मुरलीधर पाटील ९५९३, के. पी. पाटील ९७४ मते , रमेश मनुदार २७५ मते, राजू पुजार १७६ मते, इरफान तालिकोटी ७२८ मते, यल्लमा कोलकार ४१० मते, आर बी पाटील, ६३८ मते, लक्ष्मण पन्नास ३५६ मते, सिताराम सुतार १३७३ मते, सुरेश लक्ष्मण पाटील ४९८ मते तर नोटा मते १२२८ मते पडली होती.
खानापूर भाजपच्या विठ्ठलराव हलगेकर यांच्या मताचा विक्रम झाला असुन ते जवळपास ५५ हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत.

विजयोत्सवासाठी खानापूर जांबोटी क्राॅसवर भाजपचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचा विजय असो विठ्ठलराव हलगेकरांचा विजय असो अशा घोषणा देऊन जांबोटी क्रॉस दणाणून सोडला.
यावेळी विजयी उमेदवार विठ्ठलराव हलगेकर यांनी जांबोटी क्रॉसवरील बसवेश्वर पुतळ्याला हार घालून अभिवादन केले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *