Wednesday , March 4 2026
Breaking News

निट्टूरच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील शेतकरी कल्लापा बाळाराम कांजळेकर (वय ४९) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे बुधवारी दि. १४ रोजी आपल्या शिवारातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेतकरी कल्लाप्पा कांजळेकर याने शेतीच्या कामासाठी विविध बँक व सहकारी संस्थांतुन कर्ज घेतले होते. त्याचा परत फेड न करता आल्याने तो सतत चिंतेत होता.
या काळजीने निराश होऊन टोकाची पाऊले उचलली. व शिवारातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना समजताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर खानापूर सरकारी दवाखान्यात शव चिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
खानापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
कल्लापा कांजळेकर याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित कन्या असा मोठा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *